मुंबई, वृत्तसंस्था । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे रविवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती मिळाली.
Actor Dilip Kumar’s health is improving but he continues to be on oxygen support: Dr. Jalil Parkar, the pulmonologist treating the actor at Mumbai’s PD Hinduja Hospital
(File photo) pic.twitter.com/Xre6f1UgF7
— ANI (@ANI) June 8, 2021
हिंदुजा रुग्णालयतील डॉ. जलील पारकर यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. पण सध्या ते ऑक्सिजन सपोर्टवर आहेत अशी माहिती पारकर यांनी दिली आहे.
९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काल ट्वीट करत सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
करोनाची लागण झाल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. ही बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. मात्र, दिलीप कुमार यांचे नेहमीच काही रूटिन चेकअप होत असतात. तर, याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.