जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका लहान मुलीकडून पाणी पडल्याच्या कारणावरून विवाहितेस शिवीगाळ करून जीठे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात रविना सोनवणे ह्या विवाहिता पती रमेश सोनवणे आणि मुलगी परी सोनवणे सह राहतात. पती खासगी नोकरीला आहे. सोमवारी ७ जून रोजी रात्री ११ वाजता परी सोनवणे ही लहान मुलगी पाण्यासोबत खेळत होती. त्यावेळी पाण्याचे काही थेंब शेजारी राहणारे फरिदा व मुनसुख (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या अंगावर पाण्याचे थेंब पडले. याचा राग आल्याने मुलीची आई सविना सोनवणे आणि आजी सालनी सालनी सोनवणे यांना फरिदा आणि मनसुख यांनी शिवीगाळ करून ‘तुम्ही इथे कसे राहतात आम्ही तुम्हाला मारून टाकू’ धमकी दिली.
विवाहितेच्या फिर्यादीवरून दोन जणांवर जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अरूण सोनार करीत आहे.