Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बस – टेम्पोच्या भीषण अपघात, १७ जणांचा मृत्यू, चार जण गंभीर

पंतप्रधान कार्यालयामधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय

by Divya Jalgaon Team
June 9, 2021
in राष्ट्रीय
0
बस – टेम्पोच्या भीषण अपघात, १७ जणांचा मृत्यू, चार जण गंभीर

उत्तरप्रदेश, वृत्तसंस्था । कानपूर येथे बस – टॅम्पोच्या धडकेत १७ जणांचा मृत्यू झाले असून यात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हि घटना ८ रोजी मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

Kanpur: 17 people lost their lives after a collision between a bus and an auto in Sachendi area.

“Four people are undergoing treatment at Hallet hospital. The bus was going to Delhi from Lucknow,” IG Mohit Agrawal says. pic.twitter.com/iuCBSs0Cf0

— ANI UP (@ANINewsUP) June 8, 2021

“दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती. चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत,” अशी माहिती कानपूरचे पोलीस निरिक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. जखमी व्यक्तींनी ते कानापूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे सांगितले आहे. जखमीपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहे. हे कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यामध्ये जात असतानाच हा अपघात झाल्याची माहिती मोहित यांनी दिली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला तपास पोलीस करत आहे, असंही मोहित यांनी स्पष्ट केलं.

Prime Minister @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from the PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to a tragic accident in Kanpur, Uttar Pradesh. Rs. 50,000 would be provided to those injured.

— PMO India (@PMOIndia) June 8, 2021

कानपूरचे पोलीस कमिश्नर असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार एक खासगी बस कामगारांना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून गुजरातला घेऊ जात होती. या धडकेमध्ये टेम्पोत असणाऱ्या अनेकांना गंभीर दुखापत झालीय अशी माहिती अरुण यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच दोन पोलीस स्थानकातील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी १० जणांचा दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तर सात जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींची अवस्थाही चिंताजनक असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखळ घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने मदत करण्याचे आणि जखमींवर उपचारासंदर्भातील निर्देश दिले आहेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त करतानाच मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी करुन आपल्याला अहवाल सादर करावा असे आदेश योगींनी दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या अपघातामध्ये मरण पावलेल्यांना आणि जखमींना मदत जाहीर केलीय आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री उत्तर प्रदेशमधील अपघातामध्ये मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातलगांना राष्ट्रीय मदतनिधीमधून २ लाख रुपये देण्याची घोषणा केलीय. जखमींना ५० हजारांची मदत केली जाणार आहे,” असं म्हटलं आहे.

Share post
Previous Post

भारतात ३७ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक

Next Post

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

Next Post
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group