नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये १९ पैशांची वाढ झाल्याचे यला मिळाले. तर मुंबईत पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली. मुंबईत आज पेट्रोलची किंमत १०१.७१ रुपये तर डिझेल प्रति लीटर ९३.७७ रुपयांवर पोहचले आहे. यात दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९५. ५६ रुपये तर डिझेल ८६.४७ रुपये झाले आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगना, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, लड्डाख या सहा राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली. गेल्या मे महिन्यातील ४ तारखेपासून ते आत्तापर्यंत पेट्रोलच्या किंमतींमध्ये २२ वेळा वाढ झाली आहे. एकूण ५.१५ रुपयांनी पेट्रोल या काळात वाढले.
इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक हैराण
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे देशातील नागरिकांकडून केंद्र सरकारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर विरोधी पक्षांकडूनही केंद्राविरोधात निषेध नोंदवला जात आहे.
देशात १५ जून २०१७ पासून इंधनाचे दरात सतत दरवाढ सुरु आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलची दर निश्चिती भारतीय तेल कंपन्यांकडून केली जाते. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती चढ उतार होत असतात. मात्र भारतात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
भारतात पेट्रोलवर केंद्र ३३ तर राज्य ३२ रुपये आकरते कर
सध्य़ा देशात केंद्र सरकारकडून पेट्रोलवर ३२. ९८ रुपये तर डिझेवर ३१.८३ रुपये प्रति लीटर इतका कर वसुल केला जात आहे. यात प्रत्येत राज्य सरकारकडूनही वेगळा कर आकारला जातो. महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतींवर २५ टक्के तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आकराला जात आहे. यात अजून म्हणजे अधिकचा सेस करही वसूल केला जात आहे. पेट्रोलवर प्रती लीटरमागे १० रुपये आणि डिझेलवर ३ रुपये सेस आकारला जातो. त्यामुळे प्रत्येक राज्याप्रमाणे पेट्रोल- डिझेलच्या किंमती बदलत आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसा पाहू शकतो?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.