Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेशदादा पाटील

by Divya Jalgaon Team
June 9, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेशदादा पाटील

जळगाव – केंद्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा करून जळगाव विमानतळाचा समावेश करण्याची विनंती केली होती. आजवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले होते.

नुकतेच दिल्ली येथील स्कायनेक्स एरीओ कंपनीस जळगाव येथे फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याचे काम सोपविण्यात आले असून सप्टेंबरपासून प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने राज्यातील एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहे. आता येथून जेट सर्व्ह या कंपनीने हेलिकॉप्टर प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली असून येथुन हेलिकॉप्टर प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याने जळगाव विमानतळ हे राज्यात वैमानिक प्रशिक्षण हब ओळखले जाईल. अशी माहीती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे.

आज नवी दिल्ली येथे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.

हेलिकॉफ्टर प्रशिक्षण दिले जाणार
जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सूतोवाच एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिह पुरी यांचे सह केंद्र सरकारचे तसेच एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे आभार मानले. तसेच प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्हयाच्या लौकिकात भर पडणार असून राज्यात जळगाव विमानतळ वैमानिकांचे हब म्हणून ओळखले जाणार आहे.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की नवी दिल्ली
एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांची भेट घेतली. यावेळी दिल्ली येथील स्कायनेक्स ऐरीओ प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या संदर्भातील मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. संस्थेला बीओएफटी या तत्वावर ही मान्यता देण्यात आलेली आहे. विमानतळ परिसरातील दर्शनी ५ हजार स्क्वे.मीटर जागा दिल्यानंतर सप्टेंबरपासून कामाला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाद्वारे देशात आणि देशाच्या बाहेर एकंदरीत असलेली वैमानिकांची गरज आणि मागणी लक्षात घेता आपल्या देशात या संदर्भातील मोठे काम उभे राहण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ही योजना आखली होती. या योजनेतून जळगाव येथे राज्यातील एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे यासाठी सात्यत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आज वैमानिक प्रशिक्षण सोबत हेलिकॉप्टर चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सूतोवाच एअरपोर्ट अथॉरिटी चेअरमन संजीव कुमार यांनी दीले आहे.

पाठपुरावा यशस्वी : प्रशिक्षण केंद्र लवकरच होईल सूरू
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठका घेऊन यासंबधी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि नागरी उड्डयन मंत्रालयाकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून जळगाव विमानतळ येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी माजी जलसंपदा मंत्री गिरिशभाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांचे सह सर्वच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी महोदय तसेच जळगाव विमानतळ संचालक सुनील मोंगिरवार, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य सर्वाचे मार्गदर्शन सूचना सहकार्य लाभले होते. तर जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी नात्याने विमानतळ विकासासाठी अधीक मदत करावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एअरपोर्ट अथॉरिटी चेअरमन संजीव कुमार यांच्या कडे व्यक्त केली होती.

जिल्ह्याच्या नावलौकिकात भर
राज्यातील एकमेव जळगाव येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने जिल्हावासियांसाठी आधीच आनंदाची बाब होती. आता जेट सर्व्ह या कंपनीने हेलिकॉप्टर प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली असून येथुन
लवकरच हेलिकॉप्टर प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना देखील जलद गतीने सर्व निविदा प्रक्रिया राबवून या संस्थेला मान्यता पत्र देण्यात आल्याने जळगावच्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला असून लवकरच प्रत्यक्षात उभारणीला सुरुवात होणार असल्याचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नवी दिल्ली येथुन सांगितले आहे.

विमान प्राधिकरणाने रॉयल्टीमुक्त विमानतळ दिल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वैमानिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्राने पाऊल टाकले आहे. जळगाव विमानतळावर असलेल्या अधिकच्या जागेवर आदरातिथ्य सुविधा, हॉटेल, रिसॉर्टसोबत फळ, कृषीमाल केंद्र सुरू करण्याच्या प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डायन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून लवकरच त्याला मान्यता मिळेल असेही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सांगितले आहे.

जळगावला भेट द्यावी

आज नवी दिल्ली येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन
संजीव कुमार यांच्या भेटीत त्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या कडे जळगाव जिल्ह्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.चाळीसगाव विभागाचे प्रांताधिकारी म्हणुन देखील त्यांनी काम केले आहे.तेव्हाच्या अनेक आठवण त्यांनी यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याशी सोबत चर्चा करतांना सांगितल्या. यावेळी आपण जळगाव विमानतळ येथे भेट द्या अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी चेअरमन संजीव कुमार यांना केली.

Share post
Tags: Divya Jalgaon Newsएअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमनखासदार उन्मेश पाटीलचेअरमन संजीव कुमारफ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमीहेलिकॉफ्टर प्रशिक्षण
Previous Post

शाळांच्या सक्तीच्या फी वसुली विरोधात मनसे चा एल्गार

Next Post

जळगावात घरसमोर उभी असलेली मोटारसायकल पेटविली

Next Post
जळगावात घरसमोर उभी असलेली मोटारसायकल पेटविली

जळगावात घरसमोर उभी असलेली मोटारसायकल पेटविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group