Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोना काळात अनाथ झालेल्या तरुणीच्या विवाहाला भरारी फाऊंडेशन, के.के.कॅन्सचा हातभार (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
June 8, 2021
in जळगाव, सामाजिक
0
कोरोना काळात अनाथ झालेल्या तरुणीच्या विवाहाला भरारी फाऊंडेशन, के.के.कॅन्सचा हातभार (व्हिडिओ)

जळगाव – जळगावातील भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सतर्फे जिल्ह्यातील कोरोना काळात अनाथ झालेल्या १० मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. शिरसोली येथील दशरथ बुधा भिल वय 48 यांचे कोरोनाने एप्रिल महिन्यात निधन झाले.कोरोनाच्या या संकटाने भिल कुतुम्बावर आलेल्या आर्थिक सन्कटामुळे भिल कुटुंबातील पूर्वनियोजित शुभांगी दशरथ भिल या तरुणीचा विवाह १६ जून रोजी पाचोरा येथे पार पडणार आहे. त्या निम्मीताने भरारी फाऊंडेशन व के.के.कँन्स सहकार्याने नववधू शुभान्गिला आज सोन्याचे मंगळसूत्र, दागिने, साड्या, संसाराला आवश्यक वस्तू, भांडे आणि रोख मदत व सर्व वस्तू मिळून तिस हजार पर्यंत मदत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते देण्यात आली.

पद्मावती मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, डॉ.स्वप्नील चौधरी, अमित भाटिया, विनोद ढगे, अमर कुकरेजा, रविंद्र लढ्ढा, बाळासाहेब सूर्यवंशी, रितेश लिमडा, निलेश जैन, दीपक विधाते, सचिन महाजन, निलेश झोपे विक्रांत चौधरी आदी उपस्थित होते.

कोरोना काळात अनाथ झालेल्या १० तरुणींच्या लग्नाची आणि 2५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सने स्विकारली आहे. शिरसोली येथील एका तरुणीचा विवाह दि.१६ जून रोजी पाचोरा येथे पार पडणार आहे. तरुणीसह तिच्या कुटुंबियांकडे मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मदत सुपूर्द करण्यात आली. के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी यांनी तरुणीला विवाहप्रित्यर्थ सोन्याचे मंगळसूत्र, संपूर्ण भांड्यांचा सेट, कुकर, इतर संसारोपयोगी साहित्य, दागदागिने, साड्या आणि रोख रक्कम भेट दिली आहे.

कोरोना काळात अनेकांचे छत्र हरविले असून काहींनी आपले मातृछत्र व पितृछत्र गमावले आहे. समाजात पोरके झालेल्या हा घटकापर्यंत पोहचणे आवश्यक असून त्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सकडून हे कार्य चोखपणे आणि निस्वार्थ भावनेने पार पाडले जात असून भविष्यात देखील ते याच मार्गाने कार्यरत राहतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

Share post
Tags: dipak pardeshi bharari foudationk.k.kans jalgaonके.के.कॅन्सचा हातभारभरारी फाऊंडेशन
Previous Post

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Next Post

राष्ट्रवादीचे सूर्यकांत खैरनार यांची पंचायत समिति उपसभापती पदी बिनविरोध निवड (व्हिडिओ)

Next Post
राष्ट्रवादीचे सूर्यकांत खैरनार यांची पंचायत समिति उपसभापती पदी बिनविरोध निवड (व्हिडिओ)

राष्ट्रवादीचे सूर्यकांत खैरनार यांची पंचायत समिति उपसभापती पदी बिनविरोध निवड (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group