चोपडा (मिलिंद सोनवणे) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुर्यकांत खैरनार यांची आज उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली असून छोट्याश्या गावातील कार्यकर्त्यांना पहिल्यांदा संधी मिळाल्याने यावेळी आनंद व्यक्त केला जात आहेत.
चोपडा पंचायत समितीचे उपसभापती अमिनाबी तडवी यांनी आपल्या ठरल्या काळानुसार उपसभापती पदाचा राजीनामा दिल्या. दरम्यान बारा सदस्य असलेल्या चोपडा पंचायत समितीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने संपुर्ण खान्देशातील ही पहिलीच पंचायत समिती अशी आहे की, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची सत्ता पहावयास मिळत आहे.या पंचायत समितीत सभापती म्हणून भाजपाच्या प्रतिभा बापुराव पाटील हे विराजमान आहेत तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सुर्यकांत खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ,तर शिवसेनेचे दोन सदस्य हे गैरहजर होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनील गावित म्हणून काम पाहिले. याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री कोसोदे यांनी देखील निवडणूक प्रकियेत सहभाग घेतला. दुपारी ३ वा. उपसभापती म्हणून बिनविरोध सुर्यकांत खैरनार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रतिभा पाटील, सदस्य आत्माराम म्हाळके, कल्पना पाटील, भुषण भिल्ल, मालुबाई कोळी, अमिनाबी तडवी, कल्पना दिनेश पाटील,पल्लवी भिल्ल, रामसिंग पवार, यांची उपस्थिती होती.
उपसभापती सुर्यकांत खैरनार यांची बिनविरोध निवड होताच जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, दिलीप पाटील, यशवंत पाटील, चंद्रशेखर पाटील, यशवंत पाटिल,दिनेश पाटिल पोलिस पाटिल, सौ.कल्पना पाटिल,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, यांच्या सह मान्यवरांनी सत्कार केला.