जळगाव – शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायतेचे आत्मभान जागृत केले. महाराजानी दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जातींना एकत्र करून त्यांच्या मनात स्वराज्याचं बीज रुजवलं.असे के.सी.ई.सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजित शिवराज्याभिषेक दिनी डॉ.जुगलकिशोर दुबे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. यावेळी मंचावर प्राचार्य संजय भारंबे,सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. देवेंद्र इंगळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संगीत विभागाच्या प्रा.कपिल शिंगाणे,प्रा.देवेंद्र गुरव व विभागाचे विद्यार्थी मनोज बोरसे,रोहित श्रीवंत,शुभम बागुल यांनी शिवरायांचा पोवाडा सादर केला. यावेळी प्रा.खडसे,प्रा.नारखेडे,स्वायत्त परीक्षा विभागाचे नियंत्रक जयंत चौधरी,प्रा.देवानंद सोनार उपस्थित होते. दुबे यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घ्यावयाचा असेल तर अधिकृत इतिहासाची पुस्तके अभ्यासली पाहिजे असे नमूद केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी मदत केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी केले.