जळगांव – मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन निमित्त विविध ठिकाणी वृक्षा रोपण करण्यात आले.
कोरोना काळात प्राणवायूची कमतरता लक्षात घेता नागरिकांनी एक तरी वृक्ष लागवड करावे असे मनोगत वृक्षा रोपण प्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी व्यक्त केले.
पोलीस वसाहत व पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचा हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले. या वेळी मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख ,हेमंत सोनार, मनोज भालेराव,सोपान मास्टर, मोनाली कुमावत, गणेश जोशी,गोपाळ पाटील, प्रशांत जोशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या उपक्रमासाठी प्रशांत पाटील, गजानन पाटील, अभिजित काळे यांनी परिश्रम घेतले. काळाची गरज म्हणून संस्था चालक ,समाजसेवक, नागरिकांनी वृक्ष रोपण व संवर्धनवर विशेष भर द्यावे असे आवाहन संस्था अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले.
या उपक्रमाला गायत्री प्लसेसचे संचालक निखिल ठक्कर, कृती संस्थेचे अमित माळी, चंदशेखर कपडे यांचे सहकार्य लाभले.


