जळगाव (प्राची पाठक) – तालुक्यातील अंजाळे गाव शिवारातील तापी नदीच्या काठावर चक्कर येऊन पडल्याने एका तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अनुसार, विकास भागवत सपकाळे (वय ४०वर्ष, व्यवसाय शेतकरी रा.अंजाळे ता. यावल ) हा दिनांक ५ जुन रोजी सकाळी ११ते १२ वाजेच्या दरम्यान अंजाळे शिवारातील तापी नदीच्या काठावर असलेल्या मारोती मंदीराकडे गेला असता त्या ठीकाणी अचानक त्यास चक्कर येवुन पडला. त्यास बेशुद्ध अवस्थेत प्रथम उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास तात्काळ नंतर भुसावळहुन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी विकास सपकाळे यास मृत घोषीत केले.
यासंदर्भातील मयताचे वडील भागवत नामदेव सपकाळे (वय६७ वर्ष) यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक प्रल्हाद जवरे हे करीत आहे. दरम्यान मयत विकास सपकाळे या तरुणाचे चक्कर येवुन पडल्याने मृत्यु झाल्याने त्यास सर्पदंश झाले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले, तरूण शेतकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने अंजाळे परिसरात शोककळा पसरली आहे.