जळगाव – गेल्या तीन वर्षापासून शहरातील गरीब व रस्त्यांवर राहणाऱ्या गरजूंना नित्य नियमित वेळेवर जेवणाचा देण्याचा वसा कुसुमताई फाऊंडेशन निस्वार्थ अन्नसेवा यांच्यामार्फत सातत्याने होत आहे.
शहरातील कुसुमताई फाऊंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थ अन्नसेवेतर्फे गरीब व रस्त्यावर असणाऱ्या गरजूंना लॉकडाऊन काळात असो किंवा अनलॉक काळात असो त्यांना सायंकाळी त्यांच्या जागेवर जेवण मिळविण्याचा वसा जणू कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे यांच्यासह सहकार्ऱ्यांनी घेतला आहे.
शहरात राहणारे अनेक बेघरांना जेवण मिळणे हे खूप महत्वाचे असते. यासाठी कुसुमताई फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रयत्नशिल आहेत. या कार्यात फाऊंडेशनचे संचालक सागर सपकाळे, चेतन धमके, उमेश भालेराव, शुभम घाटे, उदयन पाटील, योगेश कळसकर, दिपक सुरवाडे, यश पिंपारीया, हर्ष शहा, सिध्दार्थ शहा, मंदार पाटील, जय पिंपरीया, शुभम जोशी, अक्षय जोशी जय गरूदेव संगत जळगाव यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींचा यामध्ये समावेश आहेत.