नाशिक – दिंडोरी येथे कोजागिरि पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी मोजक्या तृतीय पंथीयांचे सप्तशृंग गडावर आगमन झाले असुन छबिन्याची मिरवणुक कोवीड नियमांचे पालन करत काढण्यात आली. पौर्णिमेला शिवालय तलावात तृतीयपंथी यांनी स्नान करून नविन वस्त्र परिधान करत विविध प्रकारचे दागिने घालुन सुवर्णलंकारांचे सुशोभिकरण केले.
कुलदेवता देवींच्या मुर्ती गुरुंच्या फोटोचे पुजन पुजाविधी मंत्रोच्चाराच्या साथीने करण्यात आला. यावेळी नवसपुर्तीसाठी कडुनिंबाच्या पानांचा प्रतिकात्मक वापर करुन पुजाविधी करण्यात येतो व नवसाच्या स्वरुपाचा उल्लेख करुन कुलदेवीला व देवतांना साकडे घालण्यात येते. व नवसपुर्ती झाल्यानंतर पुढील वर्षी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द घेण्यात येतो मात्र कोरोनामुळे या वर्षी मर्यादा आल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास कुलदेवीचा फोटो चांदीची मुर्ती सुशोभित छबिन्यात ठेवण्यात येते, काही तृतीयपंथी सुशोभीत टोपलीत गुरुंचा फोटो देवीच्या मुर्ती ठेवतात.
प्रातिनिधीक स्वरुपात या मिरवणुकीस प्रारंभ होतो. गडावरील सर्व भागातुन मिरवणुक पहील्या पायरीपर्यंत जाते त्यापुर्वी ठिकठिकाणी तृतीयपंथी नृत्य करतात त्यात काही भाविकही यात सामील होतात ही मिरवणुक पहील्या पायरीपर्यंत पोहचल्यानंतर कुलदेवी व सप्तशृंगी देवीची भेट होते निंब नेसवणे पुजाविधी पारपाडल्यानंतर सप्तशृंगीचे दर्शन करण्यात येते मात्र कोरोनामुळे पहील्या पायरीचे व फोटोचे दर्शन घेत परंपरा प्रातिनीधीक स्वरुपात पार पाडण्यात आली व परंपरेचे जतन केले .हि मिरवणूक परंपरेनुसार विधी पार पाडून दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु होतो. विशेष म्हणजे वर्षातुन एकदाच हा छबिना गुरुआज्ञेनुसार बाहेर काढण्यात येतो नंतर गुरुंच्या आदेशानुसार निश्चित ठिकाणी ठेवण्यात येतो.
प्रशासनाच्या सुचनांचे पालन करत प्रातिनिधीक स्वरुपात या परंपरेचे जतन करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्याने आभार मानुन दिलेल्या सुचनांचा आदर करुन पालन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहीती पायल गुरु यांनी दिली.