रावेर- नाशिक विभागातील निवासी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शासनाने रात्री उशिरा काढले असून यात जळगाव जिल्हातील देखील निवासी नायब तहसीलदार आहे. यात रावेर निवासी तहसीलदार सजंय तायडे यांची भूसावळ येथे याच पदावर बदली झाली आहे
जळगाव जिल्हातील पाचोरा येथील नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून संगमनेर जि.अहमदनगर येथे बदली तर एरोंडल संगायो नायब तहसीलदार मोहन सोनार यांची महसूल नायब तहसिलदार पाचोरा कडनोर यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर बदली झाली आहे.
पाचोरा नायब तहसीलदार संभाजी पाटील यांची पाचोरा निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. तर रावेर निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांची भुसावळ निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. पारोळा येथील निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांची नवापुर जि. नंदूरबार येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. अमळनेर नायब तहसीलदार आर. एस. चौधरी यांची नंदूरबार येथे बदली झाली आहे.