दिंडोरी, वणी – दुपारी पाच वाजेच्या सुमारास कळवण रस्त्यावर पायरपाडा ते अहिवंतवाडी या गावांच्या मधे असलेल्या परिसरात टियुवी व स्वीप्ट कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एक ठार तर उर्वरीत जखमी झाले आहेत. MH १५ -GX – ३८८३ या क्रमांकाची टियुवी कार आणि MH -४२- BN- ४०१७ या क्रमांकाची स्वीप्ट कार या दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली.
अपघातानंतर काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली. अपघाताच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी यांनी धाव घेतली. सदर अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तसेच जखमींना वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
या अपघातात स्वीप्ट कारमधील चालक योगेश शांताराम शेवाळे (वय ४२) रा. मोकभणगी तालुका कळवण हे जागीच ठार झाले, तर उर्वरीत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत त्यात नचिकेत योगेश बुराडे (वय ५), अथर्व मधुकर सहाणे (वय १४), योगेश रामनाथ बुराडे (वय ३४), ओमकार रतन महाले (वय २५), सुप्रिया योगेश बुराडे (वय ९) स्वानंदी योगेश बुराडे सर्व राहणार नाशिक व विभाबाई शांताराम शेवाळे (वय ६०) रा. मोकभणगी तालुका कळवण. याबरोबर इतरही काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.