Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठी बातमी : योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

by Divya Jalgaon Team
June 3, 2021
in राष्ट्रीय
0
पाच लाख तरुणांना देणार रोजगार - बाबा रामदेव यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । अॅलोपथी उपचारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टानं ‘पतांजलि’च्या ‘कोरोनिल’ औषधाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती दिल्याप्रकरणी समन्स धाडले आहेत. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.

दिल्ली मेडिकल असोसिएशननं ‘पतांजलि’कडून ‘कोरोनिल’ संदर्भात चुकीची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांच्या वकिलांना कोर्टानं याप्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत ‘पतांजलि’नं ‘कोरोनिल’ संदर्भात सार्वजनिक पातळीवर कोणतंही भाष्य करू नये, असं सांगितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १३ जुलै रोजी होणार आहे.

बाबा रामदेव यांनी याआधी अॅलोपॅथी उपचारांना मूर्ख विज्ञान ठरवून मोठा वाद निर्माण केला होता. रामदेव यांच्या विधानानंतर देशातील डॉक्टरांनी याचा जोरदार निषेध व्यक्त केला आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून बाब रामदेव यांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही बाबा रामदेव यांना पत्र लिहून डॉक्टरांप्रती केलेलं विधान अजिबात स्विकारार्ह नसून ते मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बाबा रामदेव यांनी आपलं विधान मागे घेतलं होतं.

Share post
Previous Post

जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकीची चोरी

Next Post

मुलांचे वसतीगृहात अधिक्षक पदासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
मुलांचे वसतीगृहात अधिक्षक पदासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुलांचे वसतीगृहात अधिक्षक पदासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group