जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवी पेठ येथून पिशवीतून २५ हजार रुपये रोकड लंपास केल्याची घटना घडली, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद नगर, केमिस्ट भवन येथे राहणारे अशोक सांडू काळे हे कामाच्या निमित्ताने नवीपेठेतील बँक ऑफ बडोदा येथे १ जून रोजी दुपारी १ वाजता आले. काम ओटापून घरी जात असतांना बँक ऑफ बडोदा ते बेंडाळे चौक दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता काहीही माहिती मिळाली नाही.
अशोक काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ करीत आहे