मेष:- मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.
वृषभ:- कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावेत. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.
मिथुन:- कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. यांत्रिक उद्योगातून फायदा संभवतो. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.
कर्क:- उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
सिंह:- जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कन्या:- काम आणि वेळ यांचा ताळमेळ घालावा. भांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो. तिखट व तामसी पदार्थ खाल. पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.
तूळ:- मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी. चपळाईने कामे तडीस न्याल. मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.
वृश्चिक:- घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.
धनू:- समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल. मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका. भावंडांचा विरोध सहन करावा लागेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.
मकर:- बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. पुढचा मागचा विचार न करता वागू नका. तिखट व तामसी पदार्थ खाल.
कुंभ:- इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. हित शत्रूंचा त्रास संभवतो. अती अट्टाहास करू नका. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.
मीन:- जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. स्वत:च मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता. सहकुटुंब प्रवास टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.