जळगाव – ‘इंदू नॅशनल थिएटर फेस्टिव्हल’मध्ये परिवर्तन निर्मित व श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित शंभू पाटील यांनी नाट्यरुपांतरीत, योगेश पाटील दिग्दर्शीत ‘नली’ या एकलनाट्याची निवड करण्यात आली आहे.
१ ते ५ नोव्हेंबर या पाच दिवसात ‘इंदू नॅशनल थिएटर फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. यात परिवर्तन निर्मित व श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित शंभू पाटील यांनी नाट्यरुपांतरीत, योगेश पाटील दिग्दर्शीत “नली” एकलनाट्याची निवड करण्यात आली आहे.
कोरोनात देशातील थिएटर बंद असली तरी नाशिक शहरात मात्र ‘खुला रंगमंचा’ची निर्मिती झाली आहे. या खुल्या रंगमंचाची मांडणी व व्यवस्था ही पारंपरिकतेकडे नेणारी असून याच रंगमंचावर ‘इंदू नॅशनल थिएटर फेस्टीवल’चे आयोजन केले आहे. यात हर्षल पाटील नलीचे सादरीकरण करणार आहेत. हा प्रयोग २ नोव्हेंबरला सांयकाळी नॅशनल थिएटर फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.
या फेस्टिव्हल कोरोना महामारी काळातील सर्व सरकारी नियम, अटीचे पालन करून होत असून मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थित होत आहे. या महोत्सवात पुरुषोत्तम बेर्डे यांचे पुरुक्रमा, संगीत अकादमी पुरस्कार प्राप्त राजश्री शिर्के यांचे संगीत कान्होपात्रा, किरण पावस्कर यांचे इंग्रजी नाटक सीता, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अतुल पेठे यांचे ताल भवताल यांचे सादरीकरण होईल.