चोपडा – तालुक्यातील उमर्टी येथे आदिवासी उपयोजनांतर्गत नविन पाणी पुरवठा योजनेच्या कामांचे भूमीपूजन नुकतेच आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती.
गावातील लोकसंख्या वाढत असतांना येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्याने ग्रामस्थांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांच्या नवीन योजनेच्या कामांची सुरूवात करण्याची मागणी केली. यासाठी आमदार सोनवणे यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी ३९ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आज या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रोहीणी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, जि. प. सदस्य हरिष पाटील, ए.के.गंभीर, माजी उपसरपंच लासुर, शिवसेना तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, सुनिल पाटील, गणेश पाटील, रमेश सांगोरे, टेमऱ्या बारेला, अमोल राजपूत, राजु पावरा, जेमाल पावरा, विनू पावरा, माजी सरपंच सचिन सांगोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.