जळगांव – शहरातील एका हॉस्पीटल मध्ये बोदवड तालूक्यातील महिला बाळंतपणासाठी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आली होती परंतू त्या महिलेच्या प्लेटलेटस कमी असल्याने जिवितास धोका असल्याचे सांगितले. त्यामुळे युवक काँग्रेसचे तालूकाध्यक्ष पराग घोरपडे यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ प्लेटलेट्स दिल्याने ती महिला सुखरूप आहे.
कोरोना सारखी बिकट परिस्थिती असतांना रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे. याबरोबर प्लेटलेट्स, प्लाझमा दान करण्याकडे नागरिक मनात शंका बाळगत आहे. अश्या पार्श्वभूमिवर रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना तुडवड्यामूळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या महिलांना प्लेटलेट्स वेळेवर न भेटल्याच्या कारणावरुन गर्भाच्या जिवितास धोखा निर्माण होऊ शकला असता मात्र युवक काँग्रेसचे तालूकाध्यक्ष पराग घोरपडे यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ स्वतः प्लेटलेट्स देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. सदरील महिलेला वेळेवर प्लेटलेट्स मिळाल्याने गर्भवती महिला व गर्भ यांना प्रसूतीवेळी बाधा होणार नाहीत. युवक काँग्रेसचे तालूकाध्यक्ष यांनी मदतीचा हात पुढे करत प्लेटलेट्स दान केल्याने त्यांच्या कार्याचे शहरातून कौतूक होत आहे.