भुसावळ प्रतिनिधी – फुलगाव बायपास महामार्गावर मोटरसायकलने भुसावळकडून तळवेलकडे जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत तिन तरुण ठार झाल्याची घटना दि २५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडल्याने तळवेल गावात शोककळा पसरली आहे.
येथुन जवळच असलेल्या तळवेल येथील तीन तरुण सकाळी भुसावळ येथे काही कामानिमित्त गेले असल्याचे समजते आहे .
सदरील अल्पवयीन तरुण मोटरसायकल ने घरी येत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिघाच्या डोक्याला जबर मार लागल्याने विवेक सुनील पाटील वय१७ , घटना स्थळावर मयत झाला , तर देवानंद सोपान पाटील वय १६ शिक्षण, तुषार राजेंद्र पाटील वय १७, तीघे शिक्षण घेत असलेले अल्पवयीन तरुण तळवेल येथील राहणारे असल्याचे समजते आहे
दोघं जखमीनां गोदावरी वैदयकिय महाविद्यालय जळगाव या रुग्णालयत दाखल केले असता उपचारा दरम्यान दोघांना वैद्यकिय आधिकारीं यांनी मृत घोषीत केले
अनिल प्रभाकर पाटील राहणार तळवेल यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध नोंद करण्यात आली आहे तपास सहायक पोलिस निरक्षक संदिप बोरसे , पो हे कॉ मनोहर पाटील , मुकेश जाधव, करीत आहे.