Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हाजी गफ्फार भाई….अलविदा…!

by Divya Jalgaon Team
May 25, 2021
in जळगाव, राजकीय, संपादकीय, सामाजिक
0
हाजी गफ्फार भाई….अलविदा…!

” बिछडा कुछ इस अदा से की रुत ही बदल गई,
इक शख्स सारे शहर को विरान कर गया…!”

मौत सबसे बडी सच्चाई और तलख् हकीकत है|
इस के विषय मे इन्सानी दिमाग हमेशा से सोचने के साथ साथ कायम सवाल करता रहा है और जबाब तलाशता रहा है. लेकिन ये एक ऐसा मुवम्मा है, जो न समझमे आता है, और न ही हल होता है. लेकिन जिंदगी का सफर कैसा रहा, क्या कर गुजर गये…?

” माना कि इस जमी को न गुलजार कर सके
कुछ खार कम तो कर गए गुजरे जिधर से हम”

मुस्लिम समाजाचा चेहरा…
हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे, सोमवारी रात्री माझ्या मुस्लिम मित्राचा रात्री 11 वाजता फोन आला आणि म्हणाला हाजी सहाब नही रहे, हा फोन वरणगाव येथून होता, योगायोगाने माझ्या वरणगाव च्या मित्राचे नाव ही गफ्फार आहे, त्याने दिलेल्या बातमीने मी फारच अस्वस्थ झालो… इतरांसाठी ते नेते असतील, पण माझ्या साठी ते मोठे बंधू होते. माझ्या पत्रकारिते च्या प्रवासात ते जळगाव शहरातील राजकीय घडामोडी, घटना भूतकाळातील काही अनओल्ड किस्से याचा नेमका संदर्भ व माहिती देणारं चलता बोलता एनस्यक्लोपेडिया होते. कोणती ही फारसी चांगली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमीवर नसतांना गफ्फारभाई यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात जो नाव लौकिक कमावला तो थक्क करणारा आहे. जेम तेम उर्दू सातवी पर्यन्त शिक्षण असलेल्या गफ्फारभाई यांची वक्तृत्व शैली एखाद्या साहित्यकार अथवा वक्तृत्व पटू पेक्षा सरस होती.

शैक्षणिक क्षेत्रात अब्दुल करीम सालार सर यांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रात ही पक्ष व विचारांची निष्ठा कायम ठेवली, सुरेशदादा जैन यांच्या राजकीय वाटचालीत मलिक व सालार या जोडीचे मोठे योगदान राहिले आहे. तस पाहिलं तर गफ्फारभाई राजकारणा पेक्षा सामाजिक कार्यात अधीक वावरले. कोणताही गाजावाजा न करता विधवा परित्यक्ता व असहायासाठी त्यांनी काम केले, केवळ मुस्लिम समाजातीलच नव्हे तर दलितांना ही त्यांनी सतत मदत केली. प्रत्येक समाज बद्दल प्रेम व आपुलकी, आदरभाव बाळगणारे गफ्फार भाई खऱ्या अर्थाने जळगाव शहराचा राष्ट्रीय एकात्मतेचा चेहरा होते, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही… प्रत्येका बद्दल आदरभाव ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाची उणीव नेहामीच भासत राहील,त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..

” जमाना बडे गौर से सून रहा था
आप ही सो गये दास्तां कहते कहते..”
सुरेश उज्जैनवाल, पत्रकार, जळगाव

Share post
Tags: Divya Jalgaonhaji gaffar bhaiअब्दुल करीम सालारजळगावपत्रकारसुरेश उज्जैनवालहाजी अब्दुल गफ्फार मलिक
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडी तर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्ष स्थापन

Next Post
भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडी तर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्ष स्थापन

भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडी तर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्ष स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group