जळगाव – कोविड-19 च्या लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेला परवाना दरक रिक्षा चालकांना १५००/- रु. सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्या नूतन मराठा कॉम्प्लेक्स येथील जनसंपर्क कार्यात सेवा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आज दि.२५ मे २०२१ पासून निशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार असून या सेवा कक्षाच्या माध्यमातून सर्व ऑटो रिक्षा चालकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा नेताजी सुभाष चंद्र बोस रिक्षा युनियन चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ वाणी, उपाध्यक्ष संदीप वाणी यांच्या नेतृत्वाखाली या सेवा कक्षातर्फे दि.२५ मे २०२१ ते ०५ जून २०२१ दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते रिक्षा चालक रमेश सोनार, काशिनाथ चौधरी, शरद जोशी, गणेश चौधरी, सुभाष पाटील, हितेंद्र टेकावळे व इतर चालकांना ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमदार राजुमामांच्या जनसंपर्क कार्यालयावर संपर्क करावा.
संपर्क क्र. :- प्रल्हाद सोनवणे – ९४२१००१९१९, प्रेमसिंग पाटील :- ८३९०४१४४३३, प्रमोद वाणी :- ९७३०५९६१७३, संदीप वाणी :- ८३२९६०३९३२.