चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीमध्ये सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून सेनीटायझर,मास्क वापरावा. सध्याच्या कठीण प्रसंगात अनेक परिवारातील सदस्यांचे दुर्दैवी निधन झाले तर अनेकांना प्रकृती सुधारण्यासाठी मोठा आर्थिक भार सहन करीत उपचार घ्यावे लागले. या दुर्दैवी परिस्थितीत मोफत रूग्ण सेवा देण्याचा उपक्रम अत्युंत अभिनंदनीय असून मोफत रूग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज दुपारी एक वाजता पी एम् फॉर मोदी ऑर्गनायझेशन जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ पाटील व जेसीआय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रं 1 मधील सर्व नागरिकांसाठी मोफत दवाखाना सूरू करण्यात आला त्यांचे उद्घाटन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजयाताई पवार, नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, डॉ प्रसन्न अहिरे, एन डी पाटील साहेब,सामजिक कार्यकर्ते खुशाल पाटील,राहुल पाटील ,यश पाटील, बॉबी पाटील, श्री.चौधरी काका तसेच प्रभाग एक मधील मित्र परिवार , कार्यकर्ते, मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर मुळे तालुक्यात दिलासा
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेले महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर या भव्य दिव्य वास्तू मध्ये सूरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये शेकडो रुग्णांना वेळीच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड मिळाल्याने प्राण वाचण्यास मदत झाली आज येथे उपचार घेऊन बरा झालेला रुग्ण जाताना खासदार उन्मेश दादा पाटील यांना तसेच येथील आरोग्य सेवेला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. ही मोठी आरोग्य व्यवस्था उभारल्याने शहरातील उत्साही तरूण आरोग्य सेवकांना समाजाची अधिक प्रभावी आरोग्य सेवा करता आली. अशी भावना आयोजक गणेश पाटील यांनी व्यक्त केली.