जळगाव , प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी उपस्थितांना शपथ दिली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनानिमित्त दहशतवादविरोधी दिन पाळला जातो. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ, कार्यालय अधिक्षक जे. एस. गवळी, दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, राजेंद्र वैद्य, किरण बावस्कर, एन. टी. वाघ, शाम दुसाने, संध्या पाठक, गोपाळ बहुरे, ज्ञानेश्वर राठोड, डॉ. आलोक यादव, करण गावित, देविदास गायकवाड, प्रकाश कच्छवा आदी यावेळी उपस्थित होते.