जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एम जे कॉलेजमधील पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३ मी रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विद्या नगर, खेडी शिवार येथील राहणाऱ्या गौरव पांडुरंग चौधरी (वय-२५) हे किरकोळ वस्तूचे विक्री करण्याचे काम करतात. ३ मे रोजी १२.१५ वाजेच्या सुमारास गौरव चौधरी हे दुचाकी (एमएच १२ एचटी २४९४) क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील मु.जे.महाविद्यालयासमोरील साईप्रसाद स्टेशनरी दुकानावर आले, त्यांनी मोटासायकल दुकानाच्या समोर पार्किंगल करून लावली व मित्रासह सिध्दीविनायक नगरात कामानिमित्त निघून गेले. २० मिनिटानंतर परत दुचाकीजवळ आला असता. दुचाकी जागेवर दिसून आली नाही.
परिसरात शोधाशोध करून दुचाकी न आढळल्याने रामानंदनगर पोलीस स्थानकात गेले आहे, गौरव चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना विनोद सोनवणे करीत आहे.


