नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. तसेच एका एका कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोरोनानेे ग्रासल्याचं पहायला मिळत आहे. काही उपचार घेत आहेत, तर काहींनी जगाचा निरोप घेतला आहे. यात अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
कोरोनामुळे निधन झालेल्या खासदारानंतर त्यांच्या दोन मुलांचाही कोरोनाने जीव घेतला आहे. रघुनाथ मोहपात्रा यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झालं होतं. आता त्यांच्या दोन्ही मुलांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मोहपात्रा यांच्या दोन मुलांनाही कोरोना झाला होता. त्यांचा दुसरा मुलगा प्रशांत मोहपात्राचं कालच कोरोनामुळे निधन झालं आहे. तो ओडिशा रणजी ट्रॉफी क्रिकेट टीममचा माजी कॅप्टन होता.
रघुनाथ मोहपात्रा यांचा सर्वात मोठा मुलगा जशोपंत मोहपात्रा यांचासुद्धा कोरोनामुळे जीव गेला आहे. एम्स भुवनेश्वरमधून त्यांना एसयूएममध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. ते 52 वर्षांचे होते.