नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आधीच करोना आणि लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे पुरते कंबरडे मोडले असून, आता लोकांना आर्थिक चणचण सुद्धा जाणवू लागली आहे. आणि अश्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये शुक्रवारी (दि. 21) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 93 रुपये 4 पैसे इतके आहे. तर मुंबईत पेट्रोल 94 रुपये 71 पैसे असून, डिझेलचा दर 88 रुपये 62 पैसे आहे.
चेन्नई मध्ये पेट्रोल 93 रुपये 11 पैसे आहे. तर डिझेल 86 रुपये 64 पैसे आहे. सध्या सततच्या इंधन दरवाढी मुळे सामान्य लोकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.