जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये ६१८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज ६७० जण बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.
जळगाव शहर-६६, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-५७, अमळनेर-३९, चोपडा-८५, पाचोरा-६, भडगाव-४, धरणगाव-३५, यावल-३४, एरंडोल-४५, जामनेर-६०, रावेर-३२, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-३२, बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ६१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३४ हजार ५११ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २२ हजार ४५२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत तर ९ हजार ६५३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.