जळगाव – दुसऱ्या वर्षी मुस्लिम धर्मीयांचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा उत्सव म्हणजे रमजान ईद. वर्षातून दोनदा रमजान ईद व बकर ईद ची नमाज ईद गाह मैदानावर होत असते परंतु लगातार दुसऱ्या वर्षी सुद्धा मुस्लिम समाज आपल्या सामूहिक नमाज पठण पासून वंचित राहणार आहे
इदगाह व कब्रस्थान ची साफ सफाई
जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठी ट्रस्ट म्हणून मुस्लिम ईदगाह व कबरस्तान ट्रस्ट जळगाव ही गणली जाते. वयाच्या माध्यमाने रमजान ईद व बकरी ईदची नमाज इदगा च्या मैदानावर साजरी केली जाते.
जरी नमाज अदा केली जाणार नसली तरी इदगाह कब्रस्तान ची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली असून ईद च्या स्वागत करण्यासाठी ट्रस्ट तत्पर आहे त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण इदगाह चे कार्यालय,कब्रस्थान व ईदगाह ची सफाई करण्यात आली.