जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ८४९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर आज दिवसभरामध्ये ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. तसेच ८४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-८६, जळगाव ग्रामीण- २२, भुसावळ-१६३, अमळनेर-२६, चोपडा-४२, पाचोरा-१५, भडगाव-८, धरणगाव-१५, यावल-२५, एरंडोल-२२, जामनेर-६१, रावेर-५२, पारोळा-१६, चाळीसगाव-४८, मुक्ताईनगर-१७१, बोदवड-५१ आणि बोदवड-२६ असे एकुण ८४९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३२ हजार ४२३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २० हजार १५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ८९४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ११ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.