जळगाव – जिल्ह्यातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हे गुन्हे उडघकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे पथकाला दिल्या होत्या. या पथकाला एरंडोल तालुक्यातील ब्राम्हणे येथील प्रवीण सांजी पाटील (वय ३०) हा अट्टल चोरटा जिल्ह्यात मोटारसायकली चोरीत असल्याचे कळताच त्याला पाळधी गावाजवळून सापळा रचून त्याला अटक केली.
सागर सुभाष धनगर (वय २२, रा. निमगाव ता. यावल) हा देखील त्याच्यासोबत दुचाकी चोरी करीत असल्याचे प्रवीण याने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्या दोघांकडून एरंडोल, यावल, व पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी झालेल्या मोटारसायकली मिळून आल्या असून पुढील कारवाईसाठी प्रवीण याला एरंडोल तर सागरला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहूल पाटील, प्रितम पाटील, राजेंद्र पवार, भारत पाटील यांनी ही कारवाई केली.