जळगाव – काेराेना संसर्ग राेखण्यासाठी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र, त्यांचे उल्लंघन करून गुपचूप दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण कमी हाेत नसल्याची स्थिती आहे. शुक्रवारी पुन्हा १९ दुकानांना सील ठाेकण्यात आले.
काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी पालिकेने संपुर्ण शहरात निर्बंध लागू केले आ हेत. त्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेेळेत परवानगी दिली आहे. असे असतानाही रमजान व अक्षयतृतीयेच्या पार्श्वभुमीवर अनेक दुकानदार गुपचूप दुकाने उघडून गिऱ्हाईकी करीत असल्याचे सातत्याने उघडकीस येत आहे. शुक्रवारी उपायुक्त संताेष वाहुळे यांच्या पथकाने काेबडी बाजार, न्यू.बीजे. मार्केट, फुले मार्केट आ दी परिसरात अचानक तपासणी माेहिम राबवली. त्यात ग्राहकांना दुकानात थांबूवन बाहेरून कुलूप लावून व्यवसाय केल्याचा प्रकार उघडकीस आले. यात काही ठिकाणी कलर्सच्या दुकानांमध्ये तर काही ठिकाणी कटींग सलुनच्या दुकानांमध्ये ग्राहक आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मनपा पथकाने ९७ हजार रुपयांचा केला दंड
पालिकेचे उपायुक्त वाहुळे यांच्यासह पथकाने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास फुले मार्केट परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी काही पाच दुकाने उघडी हाेती. दुकानातील माल बाहेर काढून ताे विक्रीसाठी पाठविण्याची तयारी सुरू हाेती. दिवसभरात १९ दुकाने सिल करून सुमारे ९७ हजारांचा दंड करण्यात आला आहे. तसेच काही दुकानदारांना नाेटीस बजावून निर्बंध उठेपर्यंत दुकाने बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पथकानी कोंबडी बाजार परिसरातील राजस्थान वेल्डींग वर्क, नॅशनल प्लास्टिक स्टोअर, बीजे मार्केट मधील श्रीराज ऑटो , महाराष्ट्र पॅंटला हाऊस, वेद प्रिंटर्स, अनंत हेअर आर्ट, आकाश शूज सेंटर, दीपक किचन, विशाल युनिफॉर्म, पुष्पा कलेक्शन, राधिका ड्रेसेस, मेट्रो ड्रेसेस, या दुकानांवर कारवाई केली.