मेष:- मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल.
वृषभ:- अधिकार वाणीने बोलाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग करता येईल.
मिथुन:- मुलांची काळजी लागून राहील. उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.
कर्क:- अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
सिंह:- मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदाराशी मतभेद वाढवू नका.
कन्या:- हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.
तूळ:- कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
वृश्चिक:- कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका. भागीदारीत नवीन योजना आखाव्यात.
धनू:- अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मकर:- नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.