जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभराच्या अहवालात ८६१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर १६ जणांचा मृत्यू झाले आहे. तसेच जिल्हाभरामधून ८०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर- १२७, जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ-१०६, अमळनेर-३६, चोपडा-४७, पाचोरा-२८, भडगाव-७, धरणगाव-१५, यावल-२४, एरंडोल-२४, जामनेर-१०५, रावेर-७०, पारोळा-३५, चाळीसगाव-६७, मुक्ताईनगर- ८१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील २१ असे एकुण ८६१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयात आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १८ हजार १७२ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १६ हजार २७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ५९४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १६ कोराना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.