मुंबई, वृत्तसंस्था । चांदीतही ३०० रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६९,३२५ रुपये इतका खाली घसरला होता. मंगळवारी सोन्याचा भाव तब्बल ३२९ रुपयांनी घसरला होता, तर चांदीत ५५० रुपयांची घसरण झाली होती.
‘गुड रिटर्न्स’ वेबसाईटनुसार आज (बुधवारी) मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,५८० रुपये प्रति 10 ग्रॅम, तर २४ कॅरेटचा भाव ४५,५८० रुपये होता. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५,७९० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९,९९० रुपये भाव होता. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४,३२० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. त्यात २२० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५३० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३२० रुपये होता.
जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून आला. मंगळवारी सोन्याचा भाव १७७६ डॉलर प्रती औस इतका होता. त्यात ०.८८ टक्के घसरण झाली. चांदीतही १.४८ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २६.५६ डॉलर प्रती औंस होता. आज सोन्याचा भाव १७८०.८ डाॅलर प्रती औंस झाला.