चाळीसगाव, प्रतिनिधी – तालुक्यातील दुर्गम भागातील लोंजे गावात कोरोना लसीकरण उपकेंद्राचा शुभारंभ आज दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी लोंजे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच जिजाबाई ताराचंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य बळीराम चव्हाण ,शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या रंजनाताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, ताराचंद जाधव, रणजीत राठोड यांच्यासह डॉ. पि.के. ओस्तवाल (वैद्यकीय अधिकारी), डॉ. एम बी राठोड, श्रीमती वाटोरे समुदाय अधिकारी,अमरसींग राठोड, विजय विंचुरकर, श्री.जोहरी, पवार साहेब, नितिन तिरमली, प्रेमसिंग चव्हाण, श्रीमती वैशाली जाधव, एल.एम .कदम पठारे मॅडम अनिता राठोड मॅडम कमल पवार ,पूनम पाटील, कांचन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात तीस ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देऊन या उपकेंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून लोंजे येथे कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी लोंजे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.