चोपडा – राज्यात मराठा बांधव हलाकीचे जीवन जगत असतांना राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती न्यायालयाने रद्द केली. या दुर्दैवी निर्णयानंतर सकल मराठा समाज आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभारेल अशा आशयाचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
५ रोजी संध्याकाळी ५ वाजता चोपडा तहसील कार्यालयात मराठा समाज बांधव एकत्र आले त्यांनी तहसीलदार अनिल गावित यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देशात कोरोना महामारीने थैमान घातले असतांना माणसं वाचवून माणुसकी जगवीत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या मोठ्या शक्तीच्या आधारे एवढा मोठा निर्णय घाईघाईत घेण्यात आला. वास्तविक पाहता महामहिम राष्ट्रपती व केंद्र सरकार सदर आरक्षण देवू शकले असते तरीपण न्यायालयाने एवढी घाई का केली ? असा सवाल उपस्थित करीत कोरोना संपल्यावर जगातील सर्वात मोठे आंदोलन उभे केले जाईल असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतांना एस. बी. पाटील, प्रमोद बाविस्कर, दिनेश बाविस्कर, मंगेश भोईटे, निलेश पाटील, समाधान पाटील, रमाकांत सोनवणे, एस. एस.बाविस्कर, सतीश बोरसे , दिव्यांक सावंत, मंगेश पाटील, जयदीप देशमुख, दिपक पाटील, शशिकांत देवरे व चोपडा येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते.