Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, बुधवार, ५ मे २०२१

by Divya Jalgaon Team
May 5, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

वृषभ:- काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.

मिथुन:- लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.

कर्क:- मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

सिंह:- चारचौघात तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.

कन्या:- मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो.

तूळ:- योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडे पणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.

वृश्चिक:- भागीदारीतून चांगला लाभ होईल. शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका.

धनू:- जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. भावंडांशी मतभेद संभवतात.

मकर:- जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.

कुंभ:- स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

मीन:- हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.

Share post
Tags: ५ मे २०२१आजचे राशीभविष्यबुधवार
Previous Post

जिल्ह्यात आज बाधितांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त

Next Post

मूत्रपिंडाचे विकार वेळीच ओळखा

Next Post
मूत्रपिंडाचे विकार वेळीच ओळखा

मूत्रपिंडाचे विकार वेळीच ओळखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group