जळगाव – गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून आज बाधितांपेक्षा बरे होणार्यांची संख्या जास्त असून बरे झालेले रुग्ण संख्या १०७६ आहे व ८०८ नवीन कोरोना रुग्ण आढळले तर जिल्ह्यात आज १९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- १५३, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ- १३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा-१६, भडगाव-१७, धरणगाव -९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७८, बोदवड -४६ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे एकुण ८ ०८ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख २५ हजार ४५४ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख १३ हजार ४३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर जिल्ह्यात सध्या ९ हजार ७६८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात आज जिल्ह्यात १९ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा २ हजार २५४ झालेला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.