जळगाव- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या संकल्पनेने मेहरूणमध्ये सुरु करण्यात आले. या समाधानाची पूर्ती करण्यासाठी आज दि. ३० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर “नमस्कार : फुड एन ग्रोसरी”चा भव्य शुभारंभ होत असून हा शुभारंभ संपूर्ण सप्ताह म्हणजे ५ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.
या सुपरशॉपी मध्ये उच्च गुणवत्तेच्या सर्व गोष्टी एका छताखाली देण्याचा सुपर शॉपीचे मालक चंद्रकांत लाडवंजारी यांनी प्रयत्न केला आहे. मेहरूण परिसरातील पाणी पुरवठा ऑफिस समोरील नमस्कार सुपर मार्केट हे संपूर्ण सप्ताह सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू असणार आहे.
सात हजार स्क्वेअर फूटचे भव्य सुपर मार्केट असून विविध उत्पादनांच्या १० हजाराहून अधिक व्हरायटी अत्यंत वाजवी दरात ग्राहकांना खरेदीस उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामुळे ग्राहकांच्या खरेदीचा आनंद द्विगुणित होईल, असा नमस्कार सुपर मार्केटचा दृढविश्वास आहे. यानिमित्ताने सर्व नागरिकांना श्री सत्यनारायण पूजन व तीर्थप्रसादासाठी सुपर मार्केट तर्फे आमंत्रित करण्यात आले आहे.