जळगाव – अखिल कोळी समाज परिषद मुबंई संचलित भाऊसाहेब राऊत विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा वाढदिवस संपूर्ण स्टाफच्या उपस्थितीत साजरे करण्याची एक चांगली प्रथा सुरू करण्यात आली आहे.
भाऊसाहेब राऊत विद्यालयात याआधी ए.एस.बाविस्कर यांचे संकल्पनेतून प्रवेशित विद्यार्थ्याचे वाढदिवस, परिपाठच्या वेळी शैक्षणिक वस्तू व गुलाबपुष्प भेट देऊन साजरे करण्यात येत होते व आता नूतन मुख्याध्यापक एल.एस.तायडे व पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वाढदिवस भाऊसाहेब राऊत विद्यालय परिवारातर्फे बुके व वाढदिवस अभिष्टचिंतन पत्र देऊन सर्व स्टाफच्या उपस्थितीत भावी वाटचालीस आरोग्यदायी शुभेच्छा देऊन साजरे करण्यात येतात,
हा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यांचा वाढदिवस आहे ते विद्यार्थी व कर्मचारी वाढदिवसानिमित्त शाळेच्या ग्रंथालयास एक पुस्तक भेट देत असतात या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.