मुंबई, वृत्तसंस्था । त्यामुळे तुम्हाला लस घ्यायची असेल तर आधी को-विन ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
18 वर्षावरील लसीकरिता पात्र नागरिकांना को-विन अँप वर नाव नोंदवता येईल. को-विन अॅप वर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर एसएमएसदारे त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी व्हेरिफाय बटन वर क्लिक करावं लागेल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला इतर महत्वाची माहिती विचारण्यात येईल. यात प्रामुख्याने तुमचं नाव, जन्म तारीख, लिंग, ओळखपत्र प्रकार इत्यादींचा समावेश असेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणीवर बटन वर क्लीक करा.
एकदा नोंदणी झाली की लसीकरणा संदर्भातील सर्व महत्वाची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येईल. तसेच लस घ्यायची असल्यास याकरता लसीकरण केंद्र शोधण्यात गूगल सर्च आणि मॅप्सची मदत तुम्हाला घेता येणार आहे.
दरम्यान, देशात सध्याच्या घडीला 28 लाख 13 हजार 658 अॅक्टिव्ह रुग्ण असून 14 कोटी 19 लाख 11 हजार 223 जणांचा लसीकरण झालं आहे. भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.