जळगाव प्रतिनिधी । कुसुंबा येथील दाम्पत्याच्या मृत्यूने आज पहाटे च्या सुमारास चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन महिलांचा समावेश असल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खळबळ उडाली आहे.
कुसुंबा येथे ओम साई नगरात राहणारे दांपत्य मुरलीधर पाटील व त्यांची पत्नी आशाबाई पाटील या दोघांचा खून झाल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता पाटील दाम्पत्याच्या व्याजाच्या व्यवसायातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले होते. या दिशेने तपास केला असता आरोपींची खातरजमा करण्यात आला. यानंतर आज पहाटे 4 वाजता चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कुसुंबा येथील पाटील दाम्पत्याच्या खून प्रकरणी सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा, ता. जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०), अरुणाबाई गजानन वारंगे (३०) व चंद्रकला सुभाष धनगर (रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. अरुणाबाई व देविदास यांना कुसुंब्यातून तर सुधाकर याला चिंचखेडा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. व्याजाच्या रकमेच्या वादातून या दोघांची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य पैलू देखील तपासात समोर येण्याची शक्यता आहे. या डबल मर्डर प्रकरणात दोन महिलांचा सहभाग असल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खळबळ उडाली आहे.