जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुख्य शाखा स्टेट बँक जोडून जाणाऱ्या भरधाव कार ने दुचाकीला धडक दिल्याची घटना 25 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती मिळाली.
जखमी तरुणाचे नाव पंकज खरे असे आहे. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज खरे हा त्यांचा जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात राहणारे मित्राची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.सी.१५०) घेऊन जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाइकाला पाहण्यासाठी गेला होता. जिल्हा रुग्णालयातून परतत असताना स्टेट बँकेसमोर नवीन बसस्थानकाकडे जाणार्या चारचाकीने (क्र. एम.एच.१९ सी.वाय.९९३९) दुचाकीला जोरदार धडक दिली. पाच ते दहा फूट दुचाकींसह तरुणाला कारने फरफटत नेले. व न थांबता वेगाने पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी गंभीर जखमी झालेल्या या तरूणास जिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस स्थानकात कारवाई सुरू होती.