Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मृत्यूच्या भया सह १५ दिवस कोरोनाशी झुंज देत रुग्ण बरा होऊन घरी गेला

मानियार बिरादरी च्या कोविड दवाखान्यातील अनुभव

by Divya Jalgaon Team
April 24, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
मृत्यूच्या भया सह १५ दिवस कोरोनाशी झुंज देत रुग्ण बरा होऊन घरी गेला

जळगाव – देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक जण बळी जात आहेत यात गरीब लोकांच्या मनात फार मोठ्या प्रमाणात भीती आहे की आपल्याला कोरोना झाला तर? कोरोना झाल्यानंतर योग्य उपचार मिळाल्याने बरे होण्याचे प्रमाणही खूप मोठे आहे. सरकारी दवाखान्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणी जायला सगळेच घाबरतात व खाजगी दवाखाने चे बिल भरू शकत नसल्याने गरीब व मध्यम वर्गीय रुग्णाचे हाल होत आहे.

उदघाटना पूर्वी च गंभीर रुग्ण दाखल

जळगाव फातिमानगर येथील एका मजूर माणसाने मानियार बिरादरी ने सुरू केलेल्या डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये उद्घाटनापूर्वी प्रवेश घेतला. पेशंट चे नातेवाइक सकाळी आठ वाजता गंभीर अवस्थेत शेख मोहम्मद राफीयोद्दीन,वय ५२, यांना फारूक शेख कडे घेऊन आले व याला ऍडमिट करा अशी विनवणी केली म्हणून माणुसकीच्या दृष्टीने त्यास त्वरित ऍडमिट करून बाय पेप वर घेण्यात आले व त्याची ट्रीटमेंट सुरू झाली.

उदघाटन समारंभ व रुग्णा बाबत संशय

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे सकाळी ११ वाजता उदघाटन साठी आले व फीत कापण्या पूर्वी त्यांचे लक्ष रुग्णा कडे गेले असता त्यांनी विचारपूस करून जर आता रुग्ण बाय पेप वर असून १५ लिटर ऑक्सिजन लागत आहे तरी याला त्वरित शासकीय रुग्णालयात हलवा,आपण जोखीम स्वीकारू नका परंतु नातेवाईक यांनी स्पष्ट नकार देत आम्हास इथेच उपचार करावयाचे असे सांगितले असता डॉक्टरांच्या टीम ने त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचे आव्हान स्वीकारले.

राफीयोद्दीन शेख यांना ४ दिवस बाय पेप,६ दिवस आय सी यु मध्ये ऑक्सिजन वर व शेवटी ५ दिवस नॉन ओटु जनरल वार्डात ठेऊन त्यांना पूर्ण बरे करून त्यांची २३एप्रिल रोजी संध्याकाळी घरी सुटी देण्यात येऊन घरात १५ दिवस पूर्ण विश्रांती चा सल्ला देऊन पाठविण्यात आले.

शासन दरा पेक्षा कमी दर असले तरी परिस्थिती नसल्याने इतरांनी केले सहकार्य

मानियार बिरदारीच्या कोविड सेंटर मध्ये शासना पेक्षा कमी दर आकारले जाते तेवढे सुद्धा पैशे रुग्णा कडे नसल्याने स्वतः अडव्होकेट आमीर शेख, गुलाब बागवान,रफिक पटणी,अडव्होकेट मझहर शेख यांनी आर्थिक सहकार्य केले.

डॉक्टरांचे खरे श्रेय
डॉ सुयोग चौधरी व डॉ मंधार पंडित यांचे मार्गदर्शन व डॉ रियाज बागवान,मुख्य वैद्यकीय अधिकारी,डॉ मोहसीन शेख,डॉ एजाज शेख,डॉ अबुजर खान,डॉ फैसल शेख हे परिश्रम घेत आहे. रजनी अर्जुन बावसकर,निखिता शरद साळुंके,आयशा खान, या सुद्धा आपले योगदान देत असल्याने या सेंटर चे मुख्य समनव्यक फारूक शेख यांनी सर्वांचे आभार मानले.

Share post
Tags: Divya Jalgaonकोरोनाशी झुंज देत रुग्ण बरामानियार बिरादरी
Previous Post

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी युवराज जाधव यांची नियुक्ती

Next Post

जळगाव जिल्ह्यात 760 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण – जिल्हाधिकारी

Next Post
कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव जिल्ह्यात 760 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group