चाळीसगाव –भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती गव्हरमेन्ट ऑफ इंडिया च्या जागो ग्राहक संरक्षण समितीच्या चाळीसगांव तालुका अध्यक्षपदी येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भिमराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, महासचिव राजेश आंधळे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. निवडीबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष संदिपभाऊ जाधव, राष्ट्रीय महासचिव रेहिणी भामरे, महाराष्ट्र अध्यक्ष विद्याताई गडाख, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.डाॅ.प्रदिप सुरवाडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.