जळगाव – जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरामध्ये मोनाली कामळस्कर फाउंडेशनच्यावतीने आज 23 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जिल्ह्यात कोरोना महामारीत रक्ताची खूपच टंचाई निर्माण झाली होती. तसेच फाउंडेशनचे उपाध्यक्ष विजय नारायण वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त व मोनाली फाउंडेशनच्या पुढाकाराने आज २३ रोजी रेडक्रॉस सोसायटी जळगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 35 समाज बांधवांनी व मित्र परिवारानी रक्तदान केले आहे. शिबिर चालू असतांना रेडक्रॉसचे अध्यक्ष डॉ. श्री. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी येऊन या कोरोना महामारीत रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी नंदकिशोर कामळस्कर, सुधाकर वाणी, विजय वाणी, अनंत कश्यप, राजेश वाणी, राहुल हरणे, वासुदेव वाणी, शंकर वाणी, अजय कामळस्कर तसेच रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी वर्ग आदींनी परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.