यावल प्रतिनिधी । आज भारतीय जनता पार्टी ची बैठक धनश्री चित्र मंदिरच्या सभागृहात पार पडली. बैठकीचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केले. त्यांनी प्रस्ताविक भाषणात सांगितले की भारतीय जनता पार्टीची संघटन हे मजबूत आहेच व अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक दिलाने काम करावे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते कृषीमित्र स्व.माजी .आमदार हरिभाऊ जावळे गेल्याने तुम्ही काही पोरके झाले नाही. काही अडचणी उद्भवल्यास मला अर्ध्या रात्री फोन करा.यावल येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न .
मी तुमच्या अडीअडचणी सोडण्यास कटिबद्ध आहे असे ते म्हणाले. तर श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले की भाजपाचा विस्तार करण्यासाठी सर्वांनी अधिक जोमाने काम करून पक्षाला अधीक बळकट करावे. त्यासाठी वेळ प्रसंगी नवीन कार्यकर्ता सुद्धा जोडावे लागणार आहे व ते आपण जोडू तसेच मला पक्षाने दोन वेळा खासदार बनवले सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले.
यांची होती उपस्थिती
सदर बैठकीसाठी यावल तालुक्यातील मान्यवर व पदाधिकारी,कार्यकर्ते हजर होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, तसेच खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, विजय पुराणीक, किशोर काळकर, विजय धांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, रविंद्र पाटील, नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष ओ.बि.सी.सेलचे हर्षल पाटील, सविता अतुल भालेराव, नंदाताई सपकाळे, हिरालाल चौधरी, शरद महाजन, दिपक पाटील, राकेश फेगडे, लक्ष्मीताई मोरे, उमेश पाटील, डॉ. नरेंद्र कोल्हे, उज्जैन सिंग राजपूत, योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, अनंत नेहते, मीनाताई तडवी, विद्या पाटील, कांचनताई फालक, नितीन राणे, सरला कवडीवाले, नागेश्वर साळवे, शशिकांत चौधरी, जाबीर खान, मनोज जावळे, सोहम कोळंब, उमेश बेंडाळे, हर्षल सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पी.एस.सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने पत्रकारांनी आपली नाराजी पक्षाच्या पदाधिकारी यांच्या जवळ व्यक्त केली.
अजून वाचा
भाजपाची धरणगाव शहर तालुका बैठक उत्साहात संपन्न