भुसावळ । पूजा कॉम्प्लेक्समागील सदगुरू हौसींग सोसायटीत राहणार्या पूजा सनन्से यांनी गाळे खरेदी प्रकरणी पैसे घेऊन नोंदणी न करता वरून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील पूजा कॉम्प्लेक्समागील सदगुरू हौसींग सोसायटीत राहणार्या पूजा सनन्से यांनी गाळा विक्री खरेदी करण्यासाठी अनिल चौधरी यांच्यासोबत सुमारे वर्षभरापूर्वी व्यवहार केला होता. यासाठी त्यांनी अनिल चौधरींना ६० लाख ७० हजार रूपये अगावू देखील दिले होते. मात्र अनिल चौधरी यांनी संबंधीत गाळा खरेदी करून देण्यासाठी नोंदणीला टाळाटाळ केली. याबाबत विचारणा केली असता वरून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात संबंधीत महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकात फसवणूक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.